Tuesday 17 September 2013

माणसाची कथनी वेगळी, करणी वेगळी


पैसे नसतात
तेव्हा झाडपाला खाऊनही दिवस
काढायची माणसाची तयारी असते.
पैसा आल्यावर हाच
झाडपाला तो महागड्या हॉटेलात ऑर्डर
करतो.
पैसे नसतात तेव्हा माणूस सायकलने रपेट
करतो, पैसा आल्यावर मात्र हीच सायकल
तो जिममध्ये व्यायामासाठी चालवतो.
पैसे नसतात
तेव्हा रोजीरोटीसाठी त्याची पायपीट
चालू असते. पैसे आल्यावर मात्र हीच
पायपीट
तो चरबी कमी करण्यासाठी करतो.
माणूस स्वत:शीच प्रतारणा करीत असतो.
पत नसली तरी लग्न
करायला एका पायावर तयार असतो,
ऐपत असली की मात्र त्याला घटस्फोट
हवा असतो.
पैसे वाचवायला तो कधी बायकोलाच
आपली सेक्रेटरी बनवितो, पुढे
पैसा आला की सेक्रेटरीलाच बायको सारखे
वापरतो.
पैसे नसेल तेव्हा तो असल्याचे सोंग आणतो,
पैसा असतो तेव्हा मात्र कंगाल असल्याचे
नाटक करतो.
माणसा रे माणसा. तू वास्तव
तरी कधी स्वीकारतोस ?
शेयर बाजाराला सट्टाबाजार म्हणातोस
पण सट्टा लावतोस,
पैसा वाईट असे म्हणतोस पण त्याचा मोह
काही सोडत नाहीस,
मोठ्या पोस्टचा हव्यास नाही असे
म्हणातोस पण डोळा मात्र ती पोस्ट
कधी मिळते इकडे असतो,
जुगार आणि दारू वाइट म्हणतोस पण
तिचा नाद काही तुला सोडवत नाही.
माणूस जे बोलतो ते कधी करत नाही,
करतो ते कधी बोलत नाही.
माणसाची कथनी वेगळी, करणी वेगळी !

Tuesday 2 July 2013

02july2013 -2



















02july2013 -1








02july2013

संमोहनात दुसर्‍याच्या इच्छेविरुद्ध काहीही करता येत नाही

                  संमोहनात दुसर्‍याच्या इच्छेविरुद्ध काहीही करता येत नाही 


'संमोहन' या विषयासंबंधी अनेक प्रकारचे समज गैरसमज आहेत. वशीकरण, मोहिनी विद्या आणि संमोहन हे एकाच प्रकारचे तंत्र-मंत्रादी प्रकार आहेत, अशी सर्वसामान्य माणसांची समजूत आहे. 'डोळय़ात डोळे घालून एखाद्या व्यक्तीला संमोहित करून लुबाडलं, तिचे दागिने काढून घेतले' अशा प्रकारच्या बातम्या अधूनमधून ऐकतो, कधी कधी वृत्तपत्रातूनही वाचतो. टी.व्ही. सिरियलमधूनही संमोहनाच्या माध्यमातून असे काही प्रकार घडताना, घडवताना आपण पाहतो. स्वत:ला तज्ज्ञ म्हणवणारे तथाकथित 'संमोहन तज्ज्ञ' तोंडाला येईल ते दावे करतात. स्टेज प्रोग्राम्सच्या माध्यमातून, मनोरंजनाचे प्रयोग सादर करून या क्षेत्रामध्ये अनेक प्रकारचे गैरसमज निर्माण करण्यात मोलाची (?) भर घालतात. या तथाकथित संमोहन तज्ज्ञांना या विषयातलं फारसं कळतं असंही नाही. त्यांना एवढंच माहीत असतं, 'धर आणि टाक संमोहनात, दे सजेशन.' बस्स. संमोहनाच्या स्टेज प्रोगाम्सच्या दरम्यान निर्माण झालेल्या समस्यासुद्धा त्यांना कळत नाहीत. मग त्या समस्या हाताळण्याची क्षमता त्यांच्याजवळ कुठून असणार?

सध्या या विषयाचं फारसं गांभीर्य आणि ज्ञान नसणार्‍या संमोहन तज्ज्ञांनी व या क्षेत्रात शिरलेल्या काही भोंदूंनी या विषयासंबंधीच्या अंधश्रद्धा आणि गैरसमज मोठय़ा प्रमाणावर निर्माण करून ठेवले आहेत. 



दुसर्‍याच्या इच्छेविरुद्ध त्याच्या डोळय़ात डोळे घालून अथवा आवाज काढून त्याला संमोहनात टाकता येतं हेच मुळात खोटं आहे. संमोहनाच्या माध्यमातून मोहिनी घालता येते वा कुणाला वश करता येतं हेही धादांत खोटं आहे. दुसर्‍याच्या इच्छेविरुद्ध एखादी गोष्ट करायला लावणारं अथवा त्याला वश करणारं संमोहन, मोहिनी अथवा वशीकरण या जगात अस्तित्वातच नाही, हे सर्वप्रथम आपण समजून घेतलं पाहिजे.

आज मी ज्या 'संमोहन' विषयासंबंधी बोलतो आहे, तो म्हणजे 'हिप्नॉटिझम' या शब्दानं ओळखली जाणारी एक वैज्ञानिक शाखा आहे. हिप्नॉटिझम शब्दाचं भाषांतर म्हणून 'संमोहन' या शब्दाचा प्रयोग आपण करतो आहोत. बाकी आपल्या मराठी भाषेत त्यानं त्याला संमोहितच करून टाकलं. म्हणजे प्रभावित केलं, वश केलं, मंत्रमुग्ध केलं वगैरे अर्थानं हा शब्द वापरला जातो तो अर्थ इथे अभिप्रेत नाही. आज वैज्ञानिक युगात 'हिप्नोथेरपी' संमोहन उपचार पद्धती ही एक उपचार शाखा आहे. जगभर अनेक देशांत या शाखांमध्ये या विषयाचा संशोधनात्मक अभ्यास केला जातो. नियमितपणे पेशंट्सवर ही उपचार पद्धती वापरली जाते. किमान अडीच हजार वर्षापासून या विषयाचा वैज्ञानिक जगताला परिचय आहे. 2450 वर्षापूर्वी औषधीशास्त्राचा जनक हिप्पोक्रेट्स 'आर्ट ऑफ हिलिंग'च्या नावाखाली या पद्धतीची प्रक्रिया वापरत असे. हजारो लोकांना रोगमुक्त करण्यासाठी या प्रक्रियेचा उपयोग करत असे. मधल्या काळात, विशेषत: मध्ययुगीन काळात, अनेक विषयांमध्ये मोठय़ा प्रमाणावर अंधश्रद्धा, चुकीच्या समजुती निर्माण झाल्यात. याही विषयाचा प्रवास असाच जादुई, चमत्कारिक, आधिभौतिक समजुतीत गुरफटला. मॅग्नेटिझम्, इथेरियल, मेस्मेरिझम असा प्रवास करत करत तो शेवटी 'हिप्नॉसिस'पर्यंत येऊन पोहोचला. प्रामुख्यानं 18 व्या शतकात डॉ. जेम्स ब्रेड या शास्त्रज्ञानं दीर्घकाळ या विषयासंबंधी संशोधन करून काही महत्त्वाचे मुद्दे सिद्ध केले. सगळ्यात प्रथम त्याने अशा प्रकारच्या विषयाला 'हिप्नॉसिस' हा शब्द वापरला. हिप्नॉस नावाची ग्रिकांची एक झोप येण्यास कारणीभूत ठरणारी देवता होती. ही प्रक्रियासुद्धा झोपेच्याजवळ जाणारी आहे असं त्याला वाटल्यामुळं त्यानं 'हिप्नॉसिस' हा शब्द वापरला. आज हा शब्द जगन्मान्य झाला आहे. 'हिप्नॉसिस' या अवस्थेला ब्रिटिश इंग्लिशमध्ये 'ट्रान्स' असा शब्द वापरला जातो. पण ब्रिटनमध्येही 'हिप्नोथेरपी' हाच शब्द या विषयाच्या उपचार पद्धतीला मात्र वापरला जातो. 



संमोहनाच्या शेकडो प्रक्रिया आहेत. मी माझ्या संमोहन उपचारक अभ्यासक्रम (क)मध्ये 50 एक पॉझिटिव्ह प्रक्रिया शिकवतो. आणखी पन्नास एक निगेटिव्ह प्रक्रिया मला माहीत आहेत. त्या मी शिकवत नाही अथवा इतरांवर उपचारांसाठी वापरतही नाही. याचाच अर्थ यापेक्षाही अधिक मला माहीत नसलेल्याही अनेक प्रक्रिया या जगात अस्तित्वात आहेत.

कोणतीही प्रक्रिया वापरून माणसाची बॉडी आणि माईंड दोन्ही रिलॅक्स झालं की माणूस संमोहित अवस्थेत जातो. या अवस्थेत माणसाची सूचना स्वीकारण्याची क्षमता वाढलेली असते. माणूस एका मानसिक संतुलनाच्या अवस्थेत जातो. काही काळ 10 ते 30 मिनिटं या अवस्थेत राहिल्यास माणसाच्या मनात साचलेल्या टेन्शन्स, अँग्झायटीचा, ताणतणावांचा निचरा होतो. माणूस शांत, अधिक शांत, अंतर्बाह्य शांत बनतो. त्यामुळं तो अधिकाधिक निरोगी बनतो. त्याच्या नकारात्मक स्वभावाचे कंगोरे कमी होतात. राग, चिडचिड, भीती, टेंशन, चिंता यांचं प्रमाण कमी होतं. केवळ रोज नियमितपणे काही काळ या संमोहन अवस्थेत राहिलं तरी हे फायदे एखाद्या बायप्रॉडक्टसारखे आपल्याला प्राप्त होतात.

शिवाय संमोहित अवस्थेत आपण 'हायली सजेस्टिबल' बनत असल्यामुळे, दिलेल्या सूचना प्रभावीपणे स्वीकारत असल्यामुळे या अवस्थेचा उपयोग आपण स्वत:चं माईंड प्रोग्राम करण्यासाठी करू शकतो. त्याद्वारा आपल्या स्वभावात, वर्तणुकीत, क्रियांमध्ये, विचार करण्याच्या पद्धतीमध्ये, भावनांमध्ये विधायक व आवश्यक ते बदल घडवून आणू शकतो. आपली व्यसनं, वाईट सवयी घालवू शकतो. नवे गुण आत्मसात करू शकतो. नवी कौशल्यं, नवे तंत्र, नव्या गोष्टी उत्तमपणे शिकण्यासाठी या प्रक्रियेचा उपयोग करू शकतो. 



संमोहन ही एक आपल्या मनाची, माईंडची नैसर्गिक अवस्था आहे. मेंदूमध्ये चालणार्‍या कार्यप्रणालीला माईंड, मन असं म्हटलं जातं. आपल्या मेंदूत सातत्यानं काही प्रक्रिया चालत असतात. विद्युत लहरीसारख्या निघत (अेमिट) असतात. मेंदूच्या मज्जातंतूंमधून निघणार्‍या या विद्युत लहरींना मोजण्यासाठी आपण यंत्राचा उपयोग करतो. त्याला ई. ई.जी. घेणं असं म्हणतात. संमोहित अवस्थेत हे ई. ई. जी. नेहमी 8 ते 12 सायकल्स पर सेकंद असतात. त्याला 'अल्फा रिदम' असं म्हणण्याचाही प्रघात आहे. म्हणून संमोहनाला अल्फा रिदमची अवस्था असंही म्हटलं जातं.

खरं म्हणजे एकाग्रतेनं केलेल्या प्रार्थनेमुळं अथवा वेगवेगळ्या धर्मानी जोपासलेल्या मेडिटेशन्समुळं, ध्यान धारणेमुळंसुद्धा आपण या अल्फा रिदमच्या अवस्थेत जाऊन पोहोचतो. वैज्ञानिकदृष्टय़ा संमोहन, मेडिटेशन, ध्यानधारणा ह्या एकच अवस्था आहेत. या सगळ्याच अवस्थांमध्ये ई.ई. जी. नेहमी 8 ते 11 सायकल्स पर सेकंद असतात. तरी अनेक लोक मेडिटेशन म्हणजे काही तरी पवित्र आहे असं मानतात आणि संमोहन म्हणजे काहीतरी हिणकस, कमी प्रतीचं आहे असं त्यांच्यावर झालेल्या संस्कारामुळं समजत असतात.

मेडिटेशन, ध्यानधारणा या प्रक्रिया आपल्या संस्कारामधून आल्यामुळं त्या आपल्याला जवळच्या वाटतात. पवित्र वाटतात. पण परंपरागत भारतीय मेडिटेशन्समध्ये या अवस्थेत डायरेक्ट सूचना द्यायच्या नसतात. अशा सूचना देणं चुकीचं समजलं जातं. खरं म्हणजे या अवस्थेत आपली सूचना स्वीकारण्याची क्षमता प्रचंड वाढली असते. पण परंपरागत मेडिटेशन वापरताना आपण ही सुवर्णसंधी सोडतो, गमावतो.

भारतीय समाजात मेडिटेशन्स हे देवप्राप्तीकरिता आणि आध्यात्मिक उन्नतीकरिता वापरण्याचा प्रघात आहे. व्यावहारिक जीवनाकरिता वा व्यावहारिक उन्नतीकरिता त्याचा वापर करण्याचा प्रयत्न न झाल्यामुळे आजच्या जीवनासाठी सुसंगत असा त्यांचा विकास होऊ शकला नाही. पण संमोहनशास्त्र मात्र वैज्ञानिक पद्धतीनं अभ्यासलं जात असल्यामुळे, वापरलं जात असल्यामुळे अल्फा रिदमच्या हायली सजेस्टिबल असण्याचा उपयोग करून घेतआणि डायरेक्ट सूचना देऊन स्वत:मध्ये हवे आहे तसे बदल घडवून आणण्यासाठी माणसाच्या हाती एक प्रभावी साधन उपलब्ध करून देतं. 



शिवाय मेडिटेशनच्या प्रक्रिया जास्त कठीण आहेत. वेळखाऊ, लांबलचक आहेत. सगळ्यांनाच त्या जमत नाहीत. त्या मानानं संमोहन प्रक्रिया सोप्या, सुलभ आहेत. कमी वेळात या अवस्थेमध्ये नेणार्‍या आहेत. त्यामुळे सामान्य माणसाला संमोहन सुलभतेनं शिकता येतं. सहजतेनं वापरता येतं. त्याचा उपयोग करून आपलं मानसिक, शारीरिक आरोग्य सुधारता येतं. स्वत: चांगले बदल घडवून आणून ऐहिक आयुष्य संपन्न बनवता येतं. मेडिटेशन आणि संमोहनाची तुलना करताना मी नेहमी एक उदाहरण देत असतो. भरदुपारी अनवाणी पायानं एक माणूस चालत जातो. 5 हजार पायर्‍या चढतो. वरस्थळी पोहोचल्यावर त्याला सुंदर पक्वान्नं शिजवलेली दिसतात. पण ते न खाताच तो अनवाणी पायानं पायर्‍या उतरून खाली उतरतो. कारण त्याला उपवास असतो. दुसरा माणूस पायर्‍यांच्या बाजूनं असणार्‍या रस्त्यावरून मोटारसायकलने लवकर वर पोहोचतो. यथेच्छ पंचपक्वान्न खातो आणि सहजतेनं पुन्हा झरकन परत येतो. पहिला माणूस मेडिटेशन करणारा आहे तर दुसरा माणूस संमोहन वापरणारा आहे.

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन

समितीचे संस्थापक, संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी 9371014832